अनेकदा घर घेताना फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. काही बिल्डकर एकच घर अनेकांना विकून फसवणूक करतात. पण आता ही फसवणूक टळणार आहे. कारण RERA कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
सांगितल्याप्रमाणे RERA कायद्यात बदल केला असून यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाही. कायद्यातच बदल केल्याने कायद्याच्या चौकटीत आता विकासकांना राहावेच लागेल. RERA चे Controlling Authority श्री. अजोय मेहता यांचे आभार! pic.twitter.com/zxpS2Apamj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. यापूर्वी फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात एक बिल्डर एकच प्लॅट अनेकांना विकतो. कालांतरानं तो फ्लॅट विकत घेणाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं कळतं. पण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती. पण आता RERA कायद्यात बदल करण्यात आलाय. त्यामुळे एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही.
एखादा प्लॅट विकल्यानंतर आता त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला RERA कायद्यानुसार ऑनलाईन करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा प्लॅट कुणाला विकला गेलाय याची माहिती उपलब्ध असेल. कायद्यातील या बदलामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. अशा प्रकरणाची फसणवूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक केली जाऊ शकते.
हेही वाचा