महालक्ष्मी - समुद्राजवळ असलेल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलिसांतर्फे"ड्रोन'ची मदत घेतली जाणार आहे. मंदिराचे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. मंदिराभोवती सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. 50 हून जास्त सीसीटिव्ही परिसरात लावले आहेत. मात्र साऱ्या परिसरावर एकाच वेळी नजर ठेवता यावी यासाठी गरज भासल्यास "ड्रोन'मार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या नियंत्रणाखालील हे "ड्रोन' मंदिर परिसरात घिरट्या घालून टेहाळणी करतील, असेही मंदिर व्यवस्थापनाने म्हटले आहे.