मुंबईतील घरे आता ६ लाख रुपयांनी स्वस्त होणार आहेत. बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमुल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील, त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असाही निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे याचा लाभ घर खरेदीदारांना होऊन घरांच्या किंमती कमी होणार आहेत.
प्रीमियम शुल्कात कपातीचा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क स्वत: भरायचे आहे. निव्वळ प्रीमियम कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाल्यास मुंबईसारख्या शहरात सरासरी ६ लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात.
मुंबई महापालिका क्षेत्रात ३५०० ते ५००० फ्लॅट्सच्या मोठ्या निवासी संकुलांचे प्रीमियम शुल्क ५०० कोटी रुपयांपर्यंत असते. प्रतिफ्लॅट हा खर्च १२.५० लाख रुपयांच्या घरात येतो. आता यांमध्ये ५० टक्के सवलत मिळाल्यास केल्यास बिल्डरांचा प्रतिफ्लॅट हा खर्च ६.२५ लाख रुपयांवर येणार आहे.त्यामुळे किमान घरांच्या किमती कमी ६ लाख रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
बांधकाम उद्योगाला विविध कामगार उपकर, मेट्रो उपकर, पायाभूत सुविधा अशा विविध अधिमूल्यांपोटी महापालिका आणि राज्य सरकारला बांधकामाच्या प्रति चौरस फूटामागे मुंबईत ६०० ते ६५० तर ठाण्यात २५० ते ३०० रूपये द्यावे लागतात.
पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द
MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता