मुंबईतील अंधेरी भागात एका सात मजली रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतच्या सर्वा वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.
अंधेरीतील लक्ष्मी प्लाझा या सात मजली इमारतीमध्ये आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यातील एका फ्लॅटला आग लागली. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक लोकांनी तातडीने आगीची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.