Advertisement

स्मार्ट बीकेसीचं स्वप्न होणार साकार ?


स्मार्ट बीकेसीचं स्वप्न होणार साकार ?
SHARES

मुंबई - वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट पार्किंग, सीसीटीव्हीचे जाळे, स्मार्ट स्ट्रीट लाईटींग सिटीझन मोबाईल अॅप अशा एक ना अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा बीकेसीत उपलब्ध करून देण्याचं स्वप्न स्मार्ट बीकेसी प्रकल्पाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएनं दाखवलं. मात्र हा प्रकल्प अनेक कारणांनी रखडल्यानं हे स्वप्न स्वप्नच राहिलंय. आता मात्र एमएमआरडीएनं हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नव्यानं निविदा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नागपुर स्मार्ट सिटीच्या निविदेच्या धर्तीवर येत्या पंधरा दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली आहे.

या प्रकल्पासाठी नोव्हेंबर 2015 मध्ये निविदा काढण्यात आली. त्यानुसार रिलायन्स इन्फ्रा आणि एल अँण्ड टी या दोनच कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या. त्यातून रिलायन्स इन्फ्राची निवड एमएमआरडीएनं केली. मात्र ऑगस्ट 2016 मध्ये रिलायन्स इन्फ्रानं निविदेतून माघार घेत एमएमआरडीएला दणका दिला. बीकेसीला स्मार्ट करणे हे एमएमआरडीएचं मुख्य ध्येय असल्यानं आता एमएमआरडीएनं या प्रकल्पासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केलेत. त्यानुसार नागपुर स्मार्ट सिटीच्या धर्तीवर निविदा काढण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव महानगर आयुक्तांकडे मंजुरीसाठी गेला असल्याचंही सुत्रांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा