Advertisement

कास्टिंग यार्डमधल्या टनेल रिंगच्या कामाला सुरुवात


कास्टिंग यार्डमधल्या टनेल रिंगच्या कामाला सुरुवात
SHARES

मुंबई - आरे कारशेड, झाडांची कत्तल, झाडांचे पुनर्रोपन, कामाचा आवाज, पुनर्वसन-विस्थापन अशा एक ना अनेक अडचणींचे ग्रहण मेट्रो-3 अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाला लागले आहे. 

या अडचणींचा परिणाम मेट्रो-3 च्या कामावर होत असल्याचं म्हटलं जातयं. पण प्रत्यक्षात हा प्रकल्प मार्गी लावणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने मात्र या सर्व अडचणींचा कोणताही परिणाम कामावर होऊ द्यायचा नाही असा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळेच एकीकडे वाद सुरू असतानाच दुसरीकडे मेट्रो-3 चे कामही दणक्यात सुरू आहे. मंगळवारी मेट्रो-3 च्या प्रकल्पातील वडाळा कास्टींग यार्डमध्ये टनेल रिंग बनवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

वडाळ्यातील चार आणि आरेतील दोन अशा सहा कास्टींग यार्डमध्ये टनेल रिंगचे सेगमेन्ट बनवण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. 33.5 किमीच्या मार्गासाठी असे 40 हजार टनेल रिंग सेगमेन्ट बनवण्यात येणार आहेत. एकीकडे बांधकामाचे काम जोरात सुरू असताना दुसरीकडे एमएमआरसीने रोलिंग स्टॉक अर्थात मेट्रो गाड्या आणण्याच्या प्रक्रियेलाही वेग दिला आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी मेट्रोमध्ये विशेष भर देण्यात येणार असल्याचे अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा