Advertisement

५९ वर्षांच्या आरजे आजी!

मुंबईत ६ जानेवारीपर्यंत 'माणदेशी' महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात रेडिओ जॉकी केराबाई सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ५९ वर्षांच्या रेडिओ जॉकी आजी अशी त्यांची ओळखच निर्माण झाली आहे.

५९ वर्षांच्या आरजे आजी!
SHARES

रेडिओ जॉकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आरजे मलिष्का, आरजे स्तुती, आरजे नावेद अशी नावं डोळ्यासमोर येतात. पण आज आम्ही तुमची ओळख करून देणार आहोत रेडिओ जॉकी आजीची... आजींचं वय जरी ५९ असलं तरी त्यांचा अनुभव तर दांडगा आहेच. पण यासोबतच त्यांचा उत्साह तरूणाईला लाजवेल असाच आहे... 

नमस्कार, 'दिडवागवाडी माझे गाव, केराबाई सरगर माझे नाव' असे शब्द कानावर पडतात तेव्हा प्रत्येक माणदेशी व्यक्तीचं लक्ष रेडिओकडे जातंच. पण सध्या केराबाई प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरात 'माणदेशी' महोत्सवाला भेट द्यायला येणाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.


लहानपणापासून गाण्याची आवड  

मुंबईत ६ जानेवारीपर्यंत 'माणदेशी' महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात रेडिओ जॉकी केराबाई सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ५९ वर्षांच्या रेडिओ जॉकी आजी अशी त्यांची ओळखच निर्माण झाली आहे. पण या वयात ही ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं. साताऱ्यापासून ८५ किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग ९०.०४ या कम्युनिटी रेडिओवर त्या १९९८ पासून  लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात.

लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला. आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता. तो पुण्यातून आणला होता. त्याच्यावर मी सकाळ संध्याकाळ गाणी ऐकायचे. तो ऐकायला लागल्यावर, आपणही पुणे केंद्रावर जावं असं सारखं माझ्या मनात येऊ लागलं.

- केराबाई सरगररेडिओ जॉकी


अखेर पूर्ण झाली इच्छा!

केराबाई यांनी रेडिओच्या आवडीबद्दल मोठ्या मुलाला सांगितलं. त्यांच्या मुलाचं म्हसवडमध्ये रोज येणं-जाणं होतं. म्हसवडला त्यानं माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र सुरू झाल्याचा बोर्ड वाचला होता. मुलानंच केराबाईंना या रेडिओ केंद्रावर आणलं. केंद्रावर असणाऱ्या सरांनी केराबाई यांना इथं का आलात विचारलं? तेव्हा केराबाईंनी मी गाणं म्हणण्यासाठी आले आहे, असं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला गाणं म्हणण्याची संधी दिली. तेव्हापासून आजतागायत त्या रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाचा त्यांच्या कुटुंबियांना देखील अभिमान आहे.



हेही वाचा

मुंबईत भरलेल्या 'माणदेशी' महोत्सवाला भेट द्याच




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा