Advertisement

आल्याचा चहा प्या आणि थंडी पळवा


आल्याचा चहा प्या आणि थंडी पळवा
SHARES

चहा हा अनेकांचा वीक पॉईंट आहे. अनेकांची सकाळ चहा आणि कॉफीने होते. मसाला चहा, आलं घातलेला चहा, ग्रीन टी असे चहाचे विविध प्रकार आज उपलब्ध आहेत. तसं योग्य प्रमाणात पिला तर चहा हा आरोग्यदायी आहे. मग तो साधा चहा असो आल्याचा चहा असो वा ग्रीन टी असो. पण थंडीत आल्याचा चहा अधिक सेवन करावा. कारण आल्याचा चहा हा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. सर्दी, खोकला अशा अनेक समस्यांवर आल्याचा चहा उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला आल्याचा चहा पिण्याचे हेच फायदे सांगणार आहोत.


१) रक्तदाब

आल्याचा चहा घेतल्यानं रक्तप्रवाह चांगला होतो. आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण असल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे हृदय आणि रक्त वाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात.


२) डोकेदुखीपासून सुटका

आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येपासून सुटका होते. आल्यामध्ये एँटी इन्फ्लेमटोरी हा गुणधर्म आहे. त्यामुळे डोकेदुखी आणि उलटी होत असल्यास आल्याचा चहा प्यावा.


३) सर्दी-खोकल्यावर गुणकारी

हवाबदलामुळे झालेला सर्दी-खोकला किंवा घसा दुखत असल्याच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणजे आल्याचा चहा. अल्याच्या चहामध्ये असणाऱ्या एँटी हिस्टामिन या गुणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.


४) किडणीच्या आजारावर लाभदायक

आल्यामध्ये जिंजर ऑईल नावाचं बाष्पशिल तेल असतं. हे तेल अँटी बायोटिकसारखं काम करतं. त्यामुळे आल्याचा चहा किडणीच्या आजारांवर देखील लाभदायक आहे.


५) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

वारंवार आजारी पडत असाल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक क्षमता अतिशय कमकुवत आहे. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे आल्याच्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.


६) तणाव कमी होतो

तुम्ही तणावात असाल तर आल्याचा चहा पिणं फायदेशीर ठरेल. आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे तणावातून मुक्ती होते.


७) पचनक्रिया सुधारते

आल्याच्या चहामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे भूक देखील लागते. वात, कफ यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी आल्याचा चहा फायदेशीर आहे.


८) हाडांची मजबूती

आल्यामधल्या आयुर्वेदिक तत्वामुळे थंडीत आल्याचा चहा प्यायल्यास पेशी आणि स्नायू मजबूत राहण्यात मदत होते.



हेही वाचा

पुण्याचा तंदूर चहा अाता डोंबिवलीत

ब्लॅक टी आरोग्यासाठी 'चवदार'




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा