दादर – मुलगी लहान असो किंवा मोठी, सणवार असले तर नटणं, मुरडणं हे आलेच. नवरात्रोत्सव अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारपेठेत लहान मुलींसाठी घागरा चोळी उपलब्ध आहेत. या घागरा चोळी 1 वर्षाच्या मुलींपासून ते मोठ्या मुलींपर्यंत उपलब्ध आहेत. यांच्या किंमती 200 रुपयांपासून उपलब्ध आहे. हे ड्रेस डिझाइन प्लेन वेगवेगळ्या रंगसंगतीत आणि वेगवेगळ्या साइजनुसार उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी देखील आकर्षक ड्रेस लक्ष वेधून घेत आहेत. सध्या मुलांमध्ये कुर्त्यांना अधिक मागणी असल्यामुळे "गरबा स्पेशल' कुर्त्यांची दुकानांमध्ये क्रेझ पाहायला मिळते