Advertisement

'या' चित्रपटासाठी अमेय वाघ वाढवतोय वजन!

रितेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' चित्रपटातील 'बणेश फेणे'च्या भूमिकेतून प्रत्येकाला 'यss' मजा घ्यायला मिळावी यासाठी आणि 'फाफे'साठी अमेयने जवळपास १० ते ११ किलो वजन कमी केलं होतं. आणि आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी अमेय कमी केलेलं वजन पुन्हा एकदा वाढवतोय.

'या' चित्रपटासाठी अमेय वाघ वाढवतोय वजन!
SHARES

प्रेक्षकांचं दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार खूप मेहनत घेत असतो. मग तो भूमिकेचा सगळया बाजूंनी केलेला अभ्यास असो किंवा भूमिकेसाठी गरजेचा असणारा 'फिट टू फॅट' आणि 'फॅट टू फिट' लूक असो! पूर्वी हा फंडा फक्त बॉलिवूडमध्येच बघायला मिळात होता. आता हा ट्रेंड मराठी सेलिब्रिटींमध्येही रुजत आहे.
 
चित्रपट, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी गरज असल्यास वजन वाढवतात देखील आणि कमीही करतात. अर्थात, योग्य मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया चालू असते. यासाठी नुकतेच एक हटके उदाहरण द्यायचं झालं, तर सर्वांचाच आवडता अभिनेता 'अमेय वाघ'!
 


एक महत्वाची announcement: नवीन फिल्मसाठी वजन, दाढी आणि talent वाढवायचा प्रयत्न चालू आहे! वजन वाढवायचं परुळेकर सर करून घेत आहेत... दाढी मुश्किलीने वाढतीये पण talent चं आता अवघड दिसतंय! फास्टर फेणे साठी सरांच्या मार्गदर्शनाखाली 10-11 किलो वजन कमी केलं होतं! आता सुद्धा नियमित व्यायाम, सकस आहार घेऊन अत्यंत सात्विक पद्धतीने वजन वाढवतोय! अगदी जाड नाही... पण shirt size 'Small to Large' असा हा प्रवास चालू आहे! फिल्म बद्दलच्या details नंतर सांगतो! Comments section मध्ये शुभेच्छा द्या.... फुकट सल्ला नको ;)

A post shared by  amey wagh (@ameyzone) on


रितेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' चित्रपटातील 'बणेश फेणे'च्या भूमिकेतून प्रत्येकाला 'यss' मजा घ्यायला मिळावी यासाठी आणि 'फाफे'साठी अमेयने जवळपास १० ते ११ किलो वजन कमी केलं होतं. आणि आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी अमेय कमी केलेलं वजन पुन्हा एकदा वाढवतोय. वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’साठी देखील अमेयने वजनावर लक्ष दिले होते.

परुळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अमेयने ज्याप्रमाणे १० ते ११ किलो वजन कमी केलं, त्याचप्रमाणे आता वजन वाढवून आगामी भूमिकेसाठी पुन्हा एकदा तो तयार होतोय. मात्र, नियमित व्यायाम, सकस आहार घेऊन अत्यंत सात्विक पद्धतीने वजन वाढवणाऱ्या अमेयचा आगामी चित्रपट कोणता? या चित्रपटात नेमके कोणते कलाकार आहेत? हे आद्याप गुपित आहे.

या आधी प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघींनी 'वजनदार' चित्रपटासाठी आपलं वजन वाढवलं होतं. 'वजनदार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.



हेही वाचा

कसा आहे 'व्हॉट्सअॅप लग्न'? नुसतं नावावर जाऊ नका हो!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा