Advertisement

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखाचे अनुदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० लाख रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखाचे अनुदान
SHARES

२६  मार्चपासून नाशिक इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९४व्या आवृत्तीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० लाख रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं शुक्रवारी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, वार्षिक साहित्य संमेलन गोखले एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात होणार आहे. प्रख्यात विज्ञान लेखक आणि खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम सर्व कोविड -१९ सेफ्टी प्रोटोकॉलच्या अनुषंगानं आयोजित केला जाईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केली.

कोविड -१९ चा भारतात प्रादुर्भाव होऊन गेल्याच्या १ वर्षानंतर राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारली आहे, असं ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.



हेही वाचा

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मात्र...

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा