Advertisement

'आम्ही दोघी'चे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

'आम्ही दोघी'या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेची जोडी एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

'आम्ही दोघी'चे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
SHARES

'आम्ही दोघी'या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहेया पोस्टरमध्ये प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेची जोडी एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेप्रिया आणि मुक्ताचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहेया पोस्टरमधून दोघींचा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर आला आहेसहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात या दोघींनीही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या पोस्टरमध्ये मुक्ताचा साधा लूक बघायला मिळत आहे. मुक्ताने साधी कॉटनची साडी नेसली आहेकेसांमध्ये गजरा घातला आहेतर हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर मोठे कुंकू लावले आहेत्यामुळे 'आम्ही दोघीया चित्रपटात मुक्ताची भूमिका काहीशी वेगळी असेल असंच दिसतंयपोस्टरमध्ये दोघीही गोळा खाताना दिसत आहेत.


काय आहे चित्रपटात?

'आम्ही दोघी'ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहेचित्रपटात आई-मुलगीमैत्रीणबाप-मुलगीप्रियकर प्रेयसी अशा नातेसंबंधांना स्पर्श केला आहेतसेच प्रत्येक गोष्टीचा केवळ स्वत:च्या दृष्टिकोनातून विचार न करता समोरच्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, ही बाब चित्रपटाद्वारे अधोरेखित करण्यात आली आहे.

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट निर्मित 'आम्ही दोघीहा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'आम्ही दोघीया चित्रपटाद्वारे प्रतिमा जोशी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहेया आधी प्रतिमा जोशी यांची अभिनेत्रीवेशभूषाकार म्हणून ओळख होतीया चित्रपटाची पटकथा आणि संवाद भाग्यश्री जाधव हिने लिहिले आहेत.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा