Advertisement

‘सविता दामोदर परांजपे’ अमेरिकेत


‘सविता दामोदर परांजपे’ अमेरिकेत
SHARES

मराठी चित्रपटांची परदेशवारी ही आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही, पण ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मागच्या शुक्रवारी ७ सप्टेंबरला अमेरिकेतील चित्रपटगृहांतून झळकला आहे.


'या' शहरांत प्रदर्शित

ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्येच या चित्रपटाने १ कोटी रुपये उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून दररोज ४१० शोज दाखवले जात आहेत.


उत्तम थरारपट

बऱ्याच अवधीनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरुपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालं हे महत्त्वाचं. माध्यमांनीही या चित्रपटाची उत्तम दखल घेतली असून, क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा सिनेमा तसंच उत्तम माध्यमांतर अशा विशेषणांनी गौरवलं आहे. चित्रपटाची गाणी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहेत.

Advertisement


जॉन अब्राहम निर्मित सिनेमा

अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून, लेखन आणि संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत.


हेही वाचा -

बघा, 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कोण कोण आलं?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा