Advertisement

'कानभट्ट' चित्रपटाच्या मोशन पोस्टरचं अनावरण

मराठी चित्रपट 'कानभट'च्या पहिल्या लूकचं अनावरण नुकतंच करण्यात आलं आहे. या फर्स्ट लूकमुळं चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

'कानभट्ट' चित्रपटाच्या मोशन पोस्टरचं अनावरण
SHARES

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेनिर्मात्या अपर्णा होशिंग 'कानभट्ट' या आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. अपर्णा यांनी 'कानभट'च्या पहिल्या लूकचं अनावरण नुकतंच केलं आहे. या फर्स्ट लूकमुळं चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. 'कानभट्ट'मध्ये अभिनेता भव्य शिंदे मुख्य भूमिकेत असून, आपल्या अनोख्या लूकमुळं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

उत्सुकता वाढवणाऱ्या या मोशन पोस्टरमध्ये भव्य शिंदे मंदिरात उभा असल्याचं पहायला मिळतं. मंदिरासमोर गंगा नदी वाहताना दिसते. त्याच्यासमोर एका पुजाऱ्याच्या भूमिकेत असलेले अभिनेते ऋग्वेद  मुळे दिसतात. एकूणच 'कानभट्ट'चा फर्स्ट लुक उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटाची कथा एका लहान मुलाचं स्वप्न आणि इच्छा यावर बेतलेली आहे. त्या मुलाच्या जीवनात नियतीनं काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं आहे. ज्यामुळं तो एका अकल्पित वाटेवर वाटचाल करू लागतो आणि त्याचं जीवनच बदलून जातं. वेद आणि विज्ञान यांची अचूक सांगड घालत सिनेमाचं कथानक लिहिण्यात आलं आहे. हे केवळ तर्क आहेत. चित्रपटाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीजपर्यंत वाट बघावी लागेल. 

हेही वाचा- अभिनंदन, विराट-अनुष्काला मुलगी झाली हो!

दिग्दर्शक आणि निर्माता अपर्णा 'कानभट्ट'बद्दल म्हणाल्या की, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टरला लोकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं मला खूपच आनंद झाला आहे. मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी असाच विषय शोधायचा होता. जेथे आधुनिक आणि पारंपारिक मूल्यं इतरांशी जोडली जातील. 'कानभट्ट'ची कथा अगदी तशीच असून, स्वप्न आणि वास्तवाविषयी भाष्य करणारी आहे.'

अपर्णा यांनीच रॅश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'कानभट्ट'ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. मागील दशकभरापासून बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या अपर्णा यांनी 'जीना है तो ठोक डाल', 'उटपटांग'  आणि 'दशहरा'(नील नितीन मुकेश अभिनीत) आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

(motion picture release of marathi movie kaanbhatt)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा