Advertisement

'स्टेपनी' घेऊन आला भरत

एका मोठ्या विश्रांतीनंतर भरतनं पुन्हा एकदा स्वत:ला कामात झोकून दिलं आहे. एकीकडं त्याचे नवनवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर दुसरीकडं तो रंगभूमी आणि टेलिव्हीजनवरही काम करत आहे. 'मोरूची मावशी' हे भरतचं नाटक सध्या चांगलंच गाजत आहे. अशातच भरतच्या 'स्टेपनी' या आगामी मराठी चित्रपटाची माहिती मिळाली आहे.

'स्टेपनी' घेऊन आला भरत
SHARES

अभिनेता भरत जाधव नव्या जोमानं पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्याची बातमी 'मुंबई लाइव्ह'नं यापूर्वीच दिली आहे. 'धोंडी चंप्या - एक प्रेमकथा' या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात चित्रपटांमध्ये काम केल्याचं रहस्य उलगडलं होतं. या यादीतील 'स्टेपनी' हा भरतचा दुसरा मराठी चित्रपट आहे.


पुन्हा विनोदी भूमिकेत 

एका मोठ्या विश्रांतीनंतर भरतनं पुन्हा एकदा स्वत:ला कामात झोकून दिलं आहे. एकीकडं त्याचे नवनवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर दुसरीकडं तो रंगभूमी आणि टेलिव्हीजनवरही काम करत आहे. 'मोरूची मावशी' हे भरतचं नाटक सध्या चांगलंच गाजत आहे. अशातच भरतच्या 'स्टेपनी' या आगामी मराठी चित्रपटाची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात भरत पुन्हा एकदा विनोदी भूमिकेत दिसणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 


वेगळा भरत 

'स्टेपनी' या काहीशा अतरंगी शीर्षकावरूनच चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते. त्यासोबतच या चित्रपटात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा भरत पाहायला मिळेल याची जाणीवही होते. आता या चित्रपटाचं 'स्टेपनी' हे शीर्षक कोणत्या अर्थानं आहे आणि यातील स्टेपनी कोण आहे हे लवकरच समजेल. अजीज नासीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संतोष नाकट यांनी संवाद लिहिले असून, छायांकन मुरली कृष्णा यांनी केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे, तर पार्श्वसंगीत राजेश एस. एस. यांचं आहे.



हेही वाचा -

मोहन जोशी शिकताहेत ६६वी कला!

'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा