Advertisement

'जमलंय बघा' म्हणत 'माऊली'साठी संयमी बनली रेणुका


'जमलंय बघा' म्हणत 'माऊली'साठी संयमी बनली रेणुका
SHARES

राकेश ओमप्रकाश मेहरांच्या 'मिर्झिया' या चित्रपटाद्वारे बॅालिवूडमध्ये दाखल झालेली उषाकिरण यांची नात संयमी खेर आता मराठीकडे वळली असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली आहे. रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'माऊली' या आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपटाद्वारे संयमी मराठीकडे वळली आहे. या चित्रपटातील संयमीचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे.


संयमीचा लुक प्रदर्शित

आदित्य सरपोतदारच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'माऊली' या चित्रपटात रितेश पुन्हा एकदा धडाकेबाज भूमिकेत दिसणार आहे. पूर्णत: कमर्शिअल असलेल्या या मसालापटामध्ये संयमीने रेणुका नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटातील संयमीचा लुक एका पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे.


काय आहे या पोस्टरमध्ये?

चनिया चोळी परिधान केलेली आणि गावच्या मुलींसारखी कमरेवर हात ठेवून ऐटीत उभी असलेली संयमी या पोस्टरवर दिसते. उजव्या खांद्यावरून पुढे येणारी केसांची वेणी आणि चेहऱ्यावर सुंदर स्माईल असं संयमीचं रुप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


ग्लॅमरला साधेपणाचा तडका

पोस्टरच्या वरच्या बाजूला रेणूका हे संयमीने साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव असून खाली 'जमलंय बघा' अशी कॅचलाईन लिहिण्यात आली आहे. मराठमोळी असले तरी थेट हिंदीतून करियर सुरू केल्यानंतर दुसऱ्याच चित्रपटात मराठीकडे वळण्याचं धाडस करणं मला जमलंय हेच तर संयमी या कॅचलाईनमधून सुचवत नसावी ना! या चित्रपटात संयमीच्या ग्लॅमरला साधेपणाचा तडका देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं जाणवतं. अजय-अतुलचं संगीत लाभलेल्या या चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. क्षितीज पटवर्धनने या चित्रपटाचं लेखन केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा