Advertisement

मोदींच्या 'मां की रसोई'ला वहिदा-आशाताईंसह पत्की-टिळेकरांचा स्पर्श

कित्येकदा इतिहास घडतो तो पुनरावृत्ती होण्याकरीताच... 'मां की रसोई'च्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली असून, वहिदा रेहमान आणि आशा भोसले यांच्यासह अशोक पत्की आणि महेश टिळेकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

मोदींच्या 'मां की रसोई'ला वहिदा-आशाताईंसह पत्की-टिळेकरांचा स्पर्श
SHARES

कित्येकदा इतिहास घडतो तो पुनरावृत्ती होण्याकरीताच... 'मां की रसोई'च्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली असून, वहिदा रेहमान आणि आशा भोसले यांच्यासह अशोक पत्की आणि महेश टिळेकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.


पहिलं न्यूट्रिशन पार्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गुजरातमध्ये देशातील पहिलं न्यूट्रिशन पार्क तयार होत आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी खास विविध स्टेशन्स असणार आहेत. या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या खेळ, दूध नगरी, फलाहार, विज्ञान अशा विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाणार आहे. या सर्व विभागांसाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शकाची नेमणूक करण्यात आली आहे. यातील एक महत्त्वाचा विभाग असलेल्या 'मां की रसोई'च्या गीत-संगीताची जबाबदारी मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.


वहिदा रेहमान आजीच्या भूमिकेत 

मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेतारकांना एकत्र आणून 'मराठी तारका' हा संगीतमय कार्यक्रम सादर करणाऱ्या टिळेकर यांनी 'मां की रसोई'साठी हिंदी गीत लिहिलं आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायलं आहे. टिळेकर यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. आशाताईंचा सदाबहार आवाज, मराठी संगीतातील जादूगार असलेल्या पत्कींचं संगीत, वहिदाजींचा सहजसुंदर अभिनय आणि टिळेकरांचं दिग्दर्शन यामुळं मोदींच्या 'मां की रसोई'ला फार मोठं ग्लॅमर प्राप्त झालं आहे. 

Advertisement


५० वर्षांनी योग

आशाताईंनी वहिदा रेहमान यांच्यासाठी 'पान खायो सय्या हमारो...' हे आजही लोकप्रिय असलेलं गाणं गायलं होतं. 'मां की रसोई'च्या निमित्तानं पुन्हा एकदा ८६ वर्षाच्या आशाताईंनी ८२ वर्षाच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी पार्श्वगायन केलं आहे. विशेष म्हणजे जवळजवळ ५० वर्षांनी 'मा की रसोई'च्या निमित्तानं हा योग जुळून आला आहे. बर्ड फ्लू, चिकुन गुनियासाठी टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यांची लिम्का बुक नॅशनल रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आलेली आहे.



हेही वाचा  -

Exclusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!

Advertisement

१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा