भायखळा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून भायखळ्यातील केशव खाडे मार्ग येथील बी. आय.टी चाळीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कवालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या आठवणी जाग्या करण्याऱ्या कवाली दत्ता खरात यांनी गायल्या. गेल्या 25 वर्षांपासून अश्या प्रकारचा कार्यक्रम या चाळीत ठेवला जातो.