Advertisement

अजित पवारांच्या NCPची 38 नावांसह उमेदवारांची यादी जाहीर

'या' नेत्यांना संधी

अजित पवारांच्या NCPची 38 नावांसह उमेदवारांची यादी जाहीर
SHARES

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

या यादीत 38 उमेदवारांची नावे आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख नावे आहेत.

राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रकाश सोळंके यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे.  

हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आणि पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. कळवा मुंब्रा मतदारसंघात पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लीम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली.



हेही वाचा

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरें विरूद्ध संदीप देशपांडे

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा