Advertisement

सोमय्या बेजबादार वक्व्यांसाठी प्रसिद्ध, त्यांना गांभीर्याने घेत नाही- नवाब मलिक

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

सोमय्या बेजबादार वक्व्यांसाठी प्रसिद्ध, त्यांना गांभीर्याने घेत नाही- नवाब मलिक
SHARES

वाधवान प्रकरणाची (wadhawan brother) माहिती मिळाल्यावर गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) आपल्या बेजबाबदार वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (minority minister nawab malik ) यांनी केला आहे. 

म्हणूनच पत्र

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात सध्या जामिनावर असलेले दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधू यांना व्हिव्हिआयपी ट्रिटमेंट देत महाबळेश्वरला जाण्यासाठी गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (principal seceratery amitabh gupta) यांनी खास पत्र दिलं. हे प्रकरण बाहेर आल्यावर त्यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलं. 

हेही वाचा- शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) आणि वाधवान कुटुंबियांचे (wadhawan brother) घरगुती संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे ऐन संचारबंदीच्या काळात कुणाच्या आदेशावरून वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचं खास पत्र देण्यात आलं, हे सांगण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी या प्रकरणी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. शिवाय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे.

चौकशीचा निर्णय

यावर राष्ट्रवादीच्या वतीने प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, वाधवान प्रकरणाची माहिती मिळाल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाची चौकशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

सोमय्या बेजबाबदार

वाधवान प्रकरणाची चौकशी होणार असतानाही भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्या पद्धतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचंच लक्षण आहे. सोमय्या हे आपल्या बेजबाबदार वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. म्हणून आम्ही सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही. आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा