आगामी बीएमसी निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. मनसे निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विधानसभेच्या विविध क्षेत्रांनुसार स्वत: राज ठाकरे आढावा घेणार आहेत.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने याची सुरुवात होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षाची स्थिती, स्थानिक परिस्थिती आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले पदाधिकारी यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
मनसे आणि भाजपमधील मैत्री
MNS आणि भाजप यांच्यात मैत्री असल्याच्या बातम्या येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत आहे. शिवतीर्थावर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज घाटकोपर पूर्व येथील भाजप आमदार पराग शहा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
हा राजकीय दौरा नसून प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले. शहा यांनी मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे भाजपसोबत आल्यास आनंद होईल, असे सांगितले.