मुंबई - महाराष्ट्र शासनानं प्रसारमाध्यमांकडे अधिकृतपणे शासनाची बाजू मांडण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांना शासकीय प्रवक्ता म्हणून घोषित केलंय. राज्य शासनाच्या विविध विभागांचे निर्णय, खुलासे आणि इतर अधिकृत शासकीय माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी ब्रिजेश सिंह यांच्यावर ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाने सोपवलीय.