कुलाबा - कुलाबा विधानसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष संजय सूर्यप्रताप सिंह यांची कुलाबा विधानसभा सोशल मीडिया प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली. 2017च्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सोशल मीडियावर सक्रीय राहण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला आहे. आझाद मैदान येथील राजीव गांधी भवन कार्यालयात मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.