वांद्रे - वॉर्ड नं. 102 मधल्या सामाजिक कार्यकर्त्या फेमिदा डीसिल्वा यांनी महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक मतदारांच्या आग्रहास्तव त्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. हा वॉ़र्ड आता महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. फेमिदा यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आणि विश्वासाची भावना आहे. फेमिदा डीसिल्वाच या वॉर्डमधून निवडून येतील, असा विश्वास इथल्या मतदारांनी व्यक्त केला आहे. स्वाभिमान संघटनेनंही फेमिदा यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे.