शिवसेनेचं (shiv sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक बदलल्यानंतर त्याची भाषाही बदलेलं, असं म्हटलं जात आहे. परंतु सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ती बदलणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सामनाच्या (saamana editorial) संपादकपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडं देण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक (saamana editor) होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.
हेही वाचा- मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच समोर नाही, तर उगाच आदळआपट कशाला? - उद्धव ठाकरे
‘सामना’तील अग्रलेखात (saamana editorial) छापून येणारा मजकूर ही उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) किंबहुना शिवसेनेची अधिकृत भूमिका समजली जात होती. या अग्रलेखांद्वारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यामुळे दररोज सामनात छापून येणाऱ्या अग्रलेखाकडे देशभरातील प्रसारमाध्यमाचं लक्ष असतं.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) हे सामनातील अग्रलेखांद्वारे रोखठोक भूमिका मांडतात हे वास्तव असलं, तरी संपादक या नात्याने अग्रलेखात छापून येणाऱ्या मजकूराची सर्व जबाबदारी यापुढं रश्मी ठाकरे यांच्यावर असणार आहे.
त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सामना हे शिवसेनेचं कुटुंब आहे. संजय राऊत देखील या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यामुळे भलेही रश्मी ठाकरे (rashmi thackeray) सामनाच्या संपादक झाल्या असल्या तरी संपादकीय विभागाची जबावदारी संजय राऊतांकडेच राहणार आहे. संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असं म्हटलं जात आहे. पण, सामनाची भाषा आहे तशीच राहील. सामनाची बाळासाहेबांकडून (bal thackeray) आलेली आहे. त्यामुळे सामनातील भाषा ही आमची पितृभाषा आहे. ती कधीच बदलणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा- आता लाभाची पदं कशी चालतात? चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सवाल