Advertisement

“राऊतसाहेब, डोळे उघडा.., देशातल्या हाहा:कारात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा”

कठीण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?

“राऊतसाहेब, डोळे उघडा.., देशातल्या हाहा:कारात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा”
SHARES

कोरोना संसर्गाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात देशात दररोज शेकडो बळी जात आहे. त्यावर भाष्य करताना हा देश रामभरोसे चालत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. परंतु देशातल्या या हाहा:कारात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असल्याचं सांगत, महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हा देश रामभरोसे चालत आहे- संजय राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. 

हेही वाचा- पीएम केअर्स व्हेंटिलेटर्स खरेदीत घोटाळा?, सचिन सावंत यांची चौकशीची मागणी

राऊतसाहेब, डोळे उघडा...देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कसं विसरून चालेल? या कठीण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?, असा टोला ट्विटरच्या माध्यमातून केशव उपाध्ये यांनी हाणला आहे.

प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथंसुद्धा ऑक्सिजनच्या तुटवड्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केलं तरच देशातील स्थिती सुधारु शकते. प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. 

ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं, असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

(maharashtra bjp spokesperson keshav upadhye reply sanjay raut on covid 19 death in india)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा