राज्यातील १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बुधवारी १८ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात कर्जमाफी देण्यात सुरूवात होईल. 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'तून शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
येत्या ३० दिवसांत ८० टक्के प्रक्रिया पूर्ण होईल, असं सांगत उरलेली २० टक्के प्रक्रिया त्रुटी काढून झाल्यावर २ महिन्यांत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी एक सॉफ्टवेयर विकसित करण्यात आलं असून त्याद्वारे बोगस अकाऊंटवर लक्ष ठेवण्यात येईल. यातून बँकांचा फायदा होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीसाठी १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ७७ लाख ते ८० लाख खाते कर्जमुक्त करण्यात येतील. दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणारे फार कमी शेतकरी असले, तरी नेमकी किती कोटींची कर्जमाफी होईल याचा अंतिम आकडा आताच सांगता येणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीबद्दल ज्या बँकांनी चुकीची माहिती दिली, त्यांची माहिती केंद्राला कळवून अशा बँकांवर कारवाईची सूचना करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आघाडीच्या काळातील चुकीच्या कर्जमाफीची वसुली सुरू आहे. ही वसुली पूर्ण झाल्यानंतर आम्ही केंद्राला कारवाईसाठी कळवणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)