Advertisement

“महाराष्ट्राला ५४ लाख लसीचे डोस पुरवले, पण आतापर्यंत फक्त २३ लाख डोसच वापरले”

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली असताना दुसरीकडे कोरोना विषाणू प्रतिबंध लशीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे.

“महाराष्ट्राला ५४ लाख लसीचे डोस पुरवले, पण आतापर्यंत फक्त २३ लाख डोसच वापरले”
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली असताना दुसरीकडे कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंध लशीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आतापर्यंत ५४ लाख कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख डोसच वापरण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एवढंच नाही, तर जावडेकर यांनी राज्य सरकारच्या गलथान कारभारावरही बोट ठेवलं आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्राला (maharashtra) आणखी कोरोना प्रतिबंधक लशींचे डोस केंद्राकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतु केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या ५४ लाख कोरोना लशींपैकी केवळ २३ लाख लशींचाच वापर आतापर्यंत करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लस वापराविना अशीच पडून आहे. आधी कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात दाखवलेला गलथानपणा आणि आता कोरोना लशींचं नियोजन करण्यात होत असलेला प्रशासकीय गोंधळ याचा उत्तम नमुना असल्याची टीका प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

हेही वाचा- दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

दरम्यान, दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत आणखी कोरोना लशींची मागणी बुधवारी केली. राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर ६० वर्षावरील व ४५ वयोगटावरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. 

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी २.२० कोटी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

(maharashtra government not used full quota of covid 19 vaccine doses alleges central cabinet minister prakash javdekar)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा