उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवरून उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा पुढे आला असून, योगी सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील हाथरसमधील घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सल्ला दिला आहे. (maharashtra home minister anil deshmukh reacts on hathras gang rape in up)
#उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @myogiadityanath गुन्हेगारांना शासन करा. पण 'फिल्म सिटी'ऐवजी 'गुंडांपासून क्लिन सिटी'वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असं अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा - "जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…"
#उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @myogiadityanath गुन्हेगारांना शासन करा. पण 'फिल्म सिटी'ऐवजी 'गुंडांपासून क्लिन सिटी'वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 29, 2020
त्याचसोबत जे कुणी म्हणतात की जातीव्यवस्था संपली, ते स्वतःलाच फसवतायत. भारतीय समाजाच्या रक्तातील हा कर्करोग गेलेला नाही, हे नागडं सत्य आहे. हाथरसच्या बलात्कारित दलित मुलीची ही चिता, त्याचा ढळढळीत पुरावा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून आपला संताप व्यक्त केला आहे.
साधारण दोन आठवड्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सवर्ण समाजातील चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढंच नाही, तर बलात्कारानंतर या तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य देखील त्यांनी केलं होतं. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरूणीवर उपचार सुरु होते. दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर यूपी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत तरूणीवर रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेवरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - सुशांत सिंह प्रकरण: सीबीआयने काय दिवे लावले?- शरद पवार