Advertisement

झिशान सिद्दीकी बनले मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष

आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर मुंबई युवक काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

झिशान सिद्दीकी बनले मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष
SHARES

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदामध्ये फेरबदल झाल्यानंतर आता मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदामध्येही बदल करण्यात आला आहे. माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर मुंबई युवक काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे, तर सूरज ठाकूर यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आहे.

आगामी BMC निवडणुकीसाठी हे बदल अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली असताना मुंबई युवक काँग्रेसची जबाबदारी झिशान सिद्दीकी यांना देऊन पक्षात नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल, असा संदेश वरिष्ठांकडून देण्यात आलेला आहे. सध्या झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वचे आमदार आहेत.

हेही वाचा- केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर, शिवसैनिक आक्रमक

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीत मतदान झालं, त्यात सूरज ठाकूर यांना जवळपास ७४ हजार मते मिळाली, तर आमदार झिशान सिद्दीकी यांना ८० हजारांहून अधिक मते मिळाली. त्यानंतर दिल्ली हायकमांडने मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे सोपवली.

झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे तेही प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा वाद पक्षाची अंतर्गत बाब असल्याचं सांगून लगेच संपवला.

त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांना आतापासूनच मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. जास्तीत तरूणांना काँग्रेसकडे वळवण्याची मोठी जबाबदारी झिशान सिद्दीकी यांच्यावर असणार आहे. महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेसची निर्णायकी भूमिका असणार आहे. भाई जगताप यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा