राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर राष्ट्रवादीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधून घेतलं. यामुळे मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला ऐन विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसला. यानंतर नवाब मलिक यांनी अहिर यांच्या पक्षप्रवेशावर बोचरी टीका केली होती. मुंबईचे अध्यक्ष असूनही त्यांना मुंबईत पक्ष वाढवण्यात अपशय आलं. त्यांच्यात जबाबदारी झेलण्याची हिंमत नसल्यानेच त्यांनी या जबाबदारीतून पळ काढला. येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं वक्तव्य मलिक यांनी केलं.
मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर @AhirsachinAhir यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिवसेनेने पडणारा नेता घेतला आहे. आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ.
— NCP (@NCPspeaks) July 25, 2019
- @nawabmalikncp pic.twitter.com/ikjf6fd3MP
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवे मुंबई अध्यक्ष म्हणून नवाब मलिक यांची निवड केली. मलिक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते १९९६, १९९९, २००४ आणि २००९ असे चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तसंच ते राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री देखील होते.
हेही वाचा-
प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणून अहिर गेले- नवाब मलिक
वरळीतून आदित्य लढवणार निवडणूक?