Advertisement

चाकरमान्यांका बाप्पा पावलो, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी


चाकरमान्यांका बाप्पा पावलो, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान टोलमाफी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली. या दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांकरीता खास स्टिकर्स देण्यात येणार असून, हे स्टिकर्स पोलीस ठाणे तसेच, आर.टी.ओ कार्यालयात १७ ऑगस्टपासून उपलब्ध होतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


परतीच्या प्रवासातही सूट

या स्टिकर्समुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नाके तसेच खेड-शिवापूर, आणेवाडी, तासवडे आणि किणी अशा सर्व टोल नाक्यांवरील टोलमधून गणेशभक्तांना सूट मिळणार आहे. हे स्टिकर्स दाखवून कोकणातून परतताना देखील वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी आणि वाहतूक नियंत्रण यासंदर्भात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महत्त्वाची बैठक झाली. यावेळी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मंडपे, पोलीस उपायुक्त अशोक दुधे तसेच पीडब्लूडी, वाहतूक विभागाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.


खड्डे दुरूस्तीची सूचना

गणेशोत्सवात टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा तसेच, रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहतूककोंडी होत असते. कोकणात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, तसेच पोलीस दलासोबतच डेल्टा फोर्स, ट्रॅफिक वाॅर्डन आदी गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

गणेशोत्सवाच्या कालावधीत लाखो प्रवासी मुंबई-सिंधुदूर्ग असा प्रवास करतात. या दिवसात रस्त्यांमध्ये गाड्या बंद पडल्यास होणारा खोळंबा टाळण्यासाठी क्रेन्स तसेच, अपघातजन्य परिस्थिती अॅम्ब्युलन्स, क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हीकल्स) देखील सज्ज ठेवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.



हे देखील वाचा -

गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती - चंद्रकात पाटील



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा