विधानसभा निवडणुकीसाठी (maharashtra vidhan sabha election) उमेदवारी (candidates) अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यात महायुती (mahayuti)आणि महाविकास आघाडीमधील (maha vikas aghadi) संघर्ष संपलेला नाही.
दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुरू आहे. महायुतीतील जागावाटपाची चुरस सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सामंजस्यही चव्हाट्यावर आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत असली तरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे. महायुतीतील फूट मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.
भाजप (bjp), शिवसेना (shiv sena) (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (ncp) (अजित पवार) (ajit pawar) किती जागा लढवणार हे अद्याप जाहीर झालेले नाही.
महाविकास आघाडीतही जागावाटपाचा गोंधळ सुरूच आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती (elections) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने दावा केलेल्या मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेने (उबाठा) जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास मंगळवारी काही मतदारसंघात शिवसेनेविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी काँग्रेसने (congress) केली आहे. शिवसेनेच्या (उबाठा) आडमुठ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस-शिवसेनेतील वाद वाढला असताना राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार) मात्र सर्व गोंधळात आनंद लुटत आहेत. शरद पवार (sharad pawar) यांनी मध्यस्थी करावी, अशी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) (shiv sena ubt) नेत्यांची भूमिका आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होणार आहे.
हेही वाचा