व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. Save The Nation, Save Democracy या विषयाचं प्रेझेंटेशन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून यावेळी करण्यात आलं. सत्ताधारी पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाहीअसा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला.
आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसापासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जावू शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. बॅलटिंग पॉईंट, व्हिव्हिपॅट आणि कंट्रोल युनिट असं ३ डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरल्या जात आहेत असेही नायडू म्हणाले.
व्हिव्हिपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत. शिवाय ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही. लोकांच्या पैशातून ९ हजार कोटी खर्च केले, मत दिल्यानंतर स्लीप मिळण्यासाठी ७ सेकंद लागत आहेत. आम्ही प्रश्न विचारतोय की, एवढा वेळ का लागतो? एक ट्विटर पोल घेण्यात आला त्यात २२ टक्के लोकांनी ७ सेकंद लागल्याचे सांगितलं. तर ५५ टक्के लोकांनी ४ सेकंद लागत असल्याचे सांगितलं, अशी माहिती यावेळी दिली.
निवडणूक आयोगाने किमान ५० टक्के ईव्हीएम मशीन्स स्लीप तपासाव्या. ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅट स्लीपच्या काऊंट जर वेगळा असेल तर व्हिव्हिपॅट स्लीप्स प्रिवेल कराव्यात असेही नायडू म्हणाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे तांत्रिकदृष्ट्या कौशल्यप्राप्त लोक राहतात. त्यामुळे आम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला असेही चंद्राबाबू नायडू म्हणाले. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. कृषी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही आत्महत्या करत आहेत. एखाद्या राजकीय पुढाऱ्याने जर आवाज उचलला तर त्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभाग धाड टाकतो. तिच अवस्था सनदी अधिकाऱ्यांचीदेखील आहे असेही चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजपची अवस्था वाईट आहे. इथे सर्व जागा आघाडीने जिंकल्या पाहिजेत. उत्तरप्रदेशमध्ये देखील त्यांच्याविरोधात वातावरण आहे. मग भाजपला मतदान कसे होणार फक्त ईव्हीएम मशीन्स हॅक करुन का असा सवालही चंद्राबाबू नायडू यांनी उपस्थित केला. जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इतर विकसित देशांनी ईव्हीएम मशीन नाकारल्या आहेत. २००९, २०१४ आणि आता मी ईव्हीएम विरोधात लढा देत आहे आणि पुढेही देत राहिन असेही चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.
लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले आहे परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली. काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात राहू नये अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.परंतु माझं मतदान मुंबईमध्ये असले तरी माझं घर बारामती आहे. त्यामुळे मी थांबू शकत होतो. परंतु थांबू दिलं गेलं नाही असे शरद पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व राजन विचारेंना त्रासदायक ठरेल?