Advertisement

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७०.३ टक्के लोकांनी लाॅकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे, असं मत नोंदवलं आहे.

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर
SHARES

कोरोनाबाबत सावधगिरी बाळगा परंतु उगाच भीती करत बसू नका, लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने लाॅकडाऊन हटवायला हवं, अशी भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षातर्फे लाॅकडाऊन हवं की नको? यासाठी आॅनलाईन सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७०.३ टक्के लोकांनी लाॅकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे, असं मत नोंदवलं आहे. (raj thackeray led maharashtra navnirman sena survey report declare about lockdown in maharashtra)

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या आॅनलाईन सर्वेक्षणाची लिंक आपल्या ट्विटर हँडलवरून सर्वांना उपलब्ध करून दिली होती. हे ऑनलाईन सर्व्हेक्षण १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत होतं. या सर्वेक्षणातील नोंदी हाती आल्यानंतर संदीप देशपांडे यांनी यातील कौल देखील ट्विटर अकाऊंटवर जाहीर केला आहे. या सर्वेक्षणात एकूण ५४१७७ जणांनी आपलं मत नोंदवलं आहे.

हेही वाचा - Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

मनसेने या आॅनलाईन सर्वेक्षणात ९ प्रश्न विचारले होते. या प्रश्नाच्या समोरील होय, नाही, माहीत नाही या ३ पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय मत नोंदवणाऱ्याला निवडायचा होता. त्यानुसार प्रत्येक प्रश्नाप्रमाणे लोकांनी नोंदवलेलं मत पुढीलप्रमाणे आहे.    

  • लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का? (सहभागी ५२,६८०) होय- ७०.३ टक्के, नाही- २६ टक्के, माहीत नाही- ३.७ टक्के
  • लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का? (सहभागी ५२,९४६) होय- ८९.०८ टक्के, नाही- ८.७ टक्के, माहीत नाही- १.५ टक्के
  • लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी व उद्योग-धंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का? (सहभागी ५२,७८१) होय- ८.७ टक्के, नाही- ८४.९ टक्के, माहीत नाही- ६.४ टक्के
  • राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का? (सहभागी ५२,४०१) होय- ३२.७ टक्के, नाही- ५२.४ टक्के, माहीत नाही- १४.९ टक्के
  • शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का? (सहभागी ५२,२९८) होय- १०.३ टक्के, नाही- ७४.३ टक्के, माहीत नाही- १५.४ टक्के
  • लोकल रेल्वेसेवा आणि एस.टी. सेवा पूर्ववत सुरू झाली पाहिजे का? (सहभागी ५२,९०१) होय- ७६.५ टक्के, नाही- १९.४ टक्के, माहीत नाही- ४.१ टक्के
  • लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का? (सहभागी ५२,९१२) होय- ८.३ टक्के, नाही- ९०.२ टक्के, माहीत नाही- १.५ टक्के
  • लॉकडाऊन काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत व योग्य मिळाली आहे का? (सहभागी ५२,२६१) होय- २५.९ टक्के, नाही- ६०.७ टक्के, माहीत नाही- १३.४ टक्के
  • या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यानी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का? (सहभागी ५२,७७९) होय- २८.४ टक्के, नाही- ६३.६ टक्के, माहीत नाही- ८ टक्के

या सर्वेक्षणाच्या आधारे मनसे आता आपली पुढील रणनिती ठरवणार आहे. लाॅकडाऊनच्या बाबतीत मनसेची भूमिका काय असेल, हा नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरेल.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा