केंद्रीय निवडणूक आयोगानं आज शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं जाहीर केलं. हा उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. तसचे उद्धव ठाकरेंचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असी चपरक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावली आहे.
नाव आणि पैसा
पैसा येतो, पैसा जातो
पुन्हा येतो...
पण एकदा का नाव गेलं की
परत येत नाही
ते येऊ शकत नाही
काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही
म्हणून नावाला जपा
नाव मोठं करा
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता.
गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.
हेही वाचा