'अजित पवार मूतऱ्या तोंडाचे आहेत, त्यांना राजकारणात काडीमात्र किंमत नाही, ते काकांच्या पुण्याईवर तरले आहेत', अशी टीका नुकतीच 'सामना'मधून करण्यात आली होती. या टिकेला अखेर पवार परिवारातील एका पवाराने सडेतोड उत्तर दिलं आहे. हे पवार आहेत, रोहित पवार. शरद पवार यांचे नातू.
'बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी आमच्या उद्धवाला सांभाळा, असं का म्हणाले होते? ते आता कळलं. बाळासाहेब हुशार होते, त्यांना माहीत होतं की उद्धव अल्लड आहेत. म्हणूनच हे उद्धवाला सांभाळून घ्या' असं ते म्हणाले, अशी फेसबुक पोस्ट टाकत रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
रोहित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत. तर राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवारांवर सामनातून जहरी टीका झाल्यानंतर अजित पवारांनी उद्धव यांना उत्तर दिल्यानंतर आता रोहित पवारही अजित पवारांच्या बाजूनं उत्तर देताना दिसत आहेत. बाळासाहेबांनी 'मार्मिक' आणि 'सामना'मधून जहरी टीका केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
त्याचवेळी उद्धव यांच्यावर तोंडसूख घेताना उद्धव कधी लोकांच्यामधून निवडून आले नाहीत की 'मातोश्री'बाहेर पडून महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत, अशा तिखट शब्दात रोहित पवारांनी उद्धव यांच्यावर हल्ला चढवला आहे.
इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता, असंही रोहित पवार शेवटी म्हणाले आहेत.
हेही वाचा -