जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याच्याच्या निर्णयाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, मात्र आज जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याच्या शिफारशीनंतर देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं, असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. देशात अजूनही पोलादीपणा शिल्लक असल्याचं हे उदाहरण आहे, असं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. ३७० कलम हटावं आणि खऱ्या अर्थाने हे राज्य भारताचा भाग व्हावा हे शिवसेनेचं स्वप्न होते. शिवसेना आणि भाजपच्या जाहिरनाम्यातही याबाबत वचन देण्यात आलं होतं. हे वचन आज पूर्ण झालं, असंही उद्धव म्हणाले.
हेही वाचा -
कलम ३७० हटवण्याची शिफारस, सर्वच स्तरावरून निर्णयाचं स्वागत
EVM विरोधात गळे काढण्याऐवजी आत्मचिंतन करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला