Advertisement

संजय राऊत यांनी घेतली नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची भेट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुर्ला येथे नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी घेतली नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची भेट
SHARES

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुर्ला येथे नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास संजय राऊत हे कुर्ला येथील नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

यावेळी नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळेस संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी गुरूवारी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. राज्याचे एक मंत्री तुरुंगात असूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी मुंबईरांशी गद्दारी केली असून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करीत सरकारला धारेवर धरले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा