Advertisement

आदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीला (Worli) सर्वात स्वच्छ वार्ड (Cleanest Ward) चा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्था व शहरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.

आदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार
SHARES

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीला (Worli) सर्वात स्वच्छ वार्ड (Cleanest Ward)  चा पुरस्कार जाहीर झाला आहे.  मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) स्वच्छता अभियानात यंदा मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्था व शहरांसाठी रविवारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदित्य यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) उपस्थित होत्या.

 मुंबई महापालिकेने शहरातील सर्वात स्वच्छ महापालिका शाळा, रुग्णालयं आणि कार्यालयांचा आढावा घेतला होता. स्वच्छता सर्वेक्षण 2020 (Swachh Sarvekshan 2020) च्या अहवालानुसार, वरळी (Worli) हा सर्वात स्वच्छ वार्ड (Cleanest Ward)  म्हणून जाहीर करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतेत वरळी वॉर्डाने पहिला क्रमांक पटकावल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केलं आहे. हिंदुजा रुग्णालय सर्वात स्वच्छ रुग्णालय ठरले आहे. तर विटी इंटरनॅशनल शाळेला सर्वात स्वच्छ शाळेचा बहुमान मिळाला आहे.  सर्वात स्वच्छ सोसायटीचा पुरस्कार Frangipani CHS ला तसंच सर्वाधिक स्वच्छ सार्वजनिक शौचालय असा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. सर्व विजेत्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचं बक्षीस मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

यावेळी आदित्य म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या माध्यमातून मिशन स्वच्छ अभियान पूर्तीसाठी मेहनतीने काम करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि स्वच्छतेसाठी आणि मुंबईला कचरामुक्त करण्याच्या कामात हातभार लागेल.  महाराष्ट्राला कचरामुक्त करणे हे आमचे मुख्य धोरण आहे.

मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग मिशन स्वच्छ सर्वेक्षण २०२० उपक्रमात स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विविध संस्थांचा सन्मान केला. महाराष्ट्राला कचरामुक्त करणे हे आमचे मुख्य धोरण आहे.

-आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 

 आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले.  आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता.  आदित्य यांच्याकडे मंत्रिमंडळात राज्याच्या पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या पुरस्काराच्या घोषणेनंतर मतदार संघातील शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन पाहणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांचे आभार व्यक्त केले.



हेही वाचा -

नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

मुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले

मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा