Advertisement

“मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं”

दुर्दैवाने मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे! अशा शब्दांत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

“मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं”
SHARES

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली केल्यानंतर भाजपच्या आरोपांना धार चढली आहे. दुर्दैवाने मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे! अशा शब्दांत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा  खच...त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.. दुर्दैवाने मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!, असं ट्विट आशिष शेलार (ashish shelar) यांनी केलं आहे.

तर, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आलं असलं किंवा निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) च्या अटकेत असले, तरी त्यांचे खरे सूत्रधार हे सरकारमध्ये बसले आहेत, त्यांचा एनआयएने तपास करून सत्य जनतेपुढं आणण्याची गरज असल्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा- सचिन वाझे, परमबीर सिंग ही तर प्यादी, सरकारमधील खरा सूत्रधार शोधा, फडणवीसांचा थेट निशाणा!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन यांचं नाव पुढं येताच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचं वारंवार सांगूनही सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तपास अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात हात असल्याचं हिरेन यांच्या पत्नीने जबाब देऊनही सरकारने वाझे यांची पाठराखण केली. 

वाझे यांच्या अटकेनंतर स्फोटक प्रकरणातील अनेक पुरावे ‘एनआयए’ला मिळाले आहेत. हा मोठ्या कटकारस्थानचा हिस्सा असू शकतो. हा सगळा प्रकार सचिन वाझे एकटेच करू शकत नाही. सचिन वाझे हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. मुंबई पोलीस(mumbai police) आयुक्तांनंतर वाझे असं समीकरण झालं होतं. 

वाझे यांच्याकडे अशी नेमकी कोणती संवेदनशील माहिती आहे? की ती उघड होण्याच्या भीतीपोटी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.  

(thackeray government responsible for dishonour of mumbai police says bjp mla ashish shelar)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा