Advertisement

एलिफंटा बोट अपघात : 'तो' ठरला देवदूत, उद्धव ठाकरेंकडून कौतुक

आरीफच्या शौर्याबद्दल Uddhav Thackeray यांनी त्याचं विशेष कौतुक केलं आहे.

एलिफंटा बोट अपघात : 'तो' ठरला देवदूत, उद्धव ठाकरेंकडून कौतुक
SHARES

मागील आठवड्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया कडून एलिफंटा कडे जाणार्‍या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये यांनी मोलाची मदत केली.

अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या आरिफ बामणे ला उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याचं कौतुक केले आहे. आरिफ हा बोटमास्टर होता. 'नीलकमल' बोटीजवळ असलेल्या दुसर्‍या एका बोटीवर तो होता. त्याने अनेकांचे जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्यांचे प्राण वाचवले आहेत.

काही दिवसांपूर्वी एलिफंटाला जवळ बोट अपघात झाला. या अपघातात 14-15 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाली. अपघात झाला तेव्हा आरिफची बोट जवळच होती. कोणताही विचार न करता आरिफने समुद्रात उडी मारली आणि त्याच्या सहकाऱ्यांसह किमान 35 प्रवाशांना वाचवले.

पायलट बोटचा वापर करून, त्यांनी वाचवलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे वासुदेव फेरीत हलवले. तसेच आरिफने एका बेशुद्ध अवस्थेत साडेतीन वर्षाच्या मुलाला वाचवले. 

त्यांच्या शौर्याबद्दल, आरिफ आणि त्याचे सहकारी क्रू सदस्य - किफायत मुल्ला, तपस कार आणि नंदू जाना - यांचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सत्कार केला. त्यांच्या साहसी बचाव प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना रोख बक्षिसे देण्यात आले.



हेही वाचा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, पण...

शिवसेना BMC निवडणूक एकट्याने लढवण्याची शक्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा