विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात शिलेदार उतरवण्यास सुरुवात केली आहे.
माहिममध्ये मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने या मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटाने देखील शिलेदार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे.
माहिम विधासभा मतदारसंघातील लढत हायव्होल्टेज लढत होणार आहे. मनसे आणि शिंदे गटाने या मतदारसंघात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दोन्ही दिग्गज उमेदवारांविरोधात ठाकरे गटाने तगडा उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महेश सावंत यांच्या एन्ट्रीने माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटानेही महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्याने अमित ठाकरे यांच्या विरोधात दोन दिग्गज उमेदवारांचं आव्हान असणार आहे.
महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेचं काम करतात. एकेकाळी ते सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेचे आंदोलन, सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग नोंदवला आहे. या मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. सदा सरवणकर यांनी राणेंसोबत शिवसेना सोडली, त्यावेळी महेश सावंत यांनीही राजीनामा दिला होता.
2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत महेश सावंत हे समाधान सरवणकर यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा 250 मतांनी पराभव केला होता.
हेही वाचा