Advertisement

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना उद्धव ठाकरे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपा-शिवसेना युती होणारच, असा विश्वास व्यक्त केला.

“पक्षासाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच आम्ही प्रवेश देत आहोत. अजून काहीजण पक्षप्रवेशासाठी इच्छुक असून त्यांना देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश देण्यात येईल.”, असंही उद्धव यांनी सांगितलं.

मुलाखतीकडे पाठ

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीकडे आ. सोपल यांनी पाठ फिरवली होती. तेव्हापासून सोपल पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आ. सोपल यांनी सोमवारी बार्शीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. 

जागा शिवसेनेकडे

सोपल यांचे विरोधक माजी आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेतून भाजपात गेल्याने सोपल यांचा रस्ता साफ झाला होता. युतीतील जागा वाटप सूत्रानुसार, बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे येत असल्याने सोपल शिवसेनेतच जाणार असा अंदाज बांधण्यात येत होता. हा अंदाज खरा ठरला आहे. 



हेही वाचा-

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

मी कुठल्याही राजकीय पक्षात जात नाहीय- संजय दत्त



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा