मुंबई मेट्रो - 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतली झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. एखाद्या मुद्द्याला घेऊन आंदोलनं करणं हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील काही विषयांवरून मुंबईत आंदोलन छेडली गेली. २०१९ साली देखील असी अनेक आंदोलनं झाली. मुंबईकरांनी देखील या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. २०१९ सालातील अशाच काही आंदोलनांवर टाकूयात एक नजर...
देशात सध्या दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट म्हणजेच सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी. या दोन्हींवरून देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, युपी, गुजरात, बंगळुरू या राज्यांमध्ये हिंसाचारही उफाळला.
सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा नुकताच संसदेत बहुमतानं संमत होऊन राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर देशभरात लागू झाला. तर ‘एनआरसी’ म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे, शिवाय ती देशभरात लागू करण्याच्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईत देखील सीएएला घेऊन प्रदर्शन करण्यात आलं. मुंबईकरांसोबतच या प्रदर्शनात अनेक सेलिब्रिटिंनी देखील हजेरी लावली होती.
सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट म्हणजेच सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून देशभरात ऐंदोलनं झाली. एक वर्ग होता जो या कायद्याच्या विरोधात होता.
तर दुसरा असाही वर्ग होता ज्यांना हा योग्य वाटत होता. जे आपल्या देशात अनधिकृत राहत आहेत त्यांना त्यांच्या देशात गेलंच पाहिजे, असा काहिंचा समज आहे. त्यामुळे या कायद्याचं समर्थन करणारं देखील एक वर्ग आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ देखील अनेक आंदोलनं झाली.
मुंबईतील २०१९ मधील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे आरेतल्या वृक्षतोडीसाठी झालेलं. मेट्रो कारशेड ३ साठी आरेतल्या २ हजाराहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. याचा अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध केला, आंदोलनं केली. पण तरीही याचा काही फायदा झाला नाही.
गोरेगाव इथल्या आरे कारशेडच्या ठिकाणी तसंच गोरेगाव चेकनाका इतं आंदोलनं करण्यात आली.
पण पोलिसांनी आंदोलकांना तुरुंगात डांबलं.
अखेर शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर २९ आंदोलनकर्त्यांन वरील सर्व गुन्हे मागे घेतले.
शिवाय आरेतल्या कारशेडच्या कामाला देखील स्थगिती दिली.
पीएमसी म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार २४ सप्टेंबर २०१९ पासून बंद करण्यात आले. रिझर्व्ह बँकेनं ३५A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढाल सहा महिन्यांसाठी बंद केले आहेत. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरू ठेवण्यास आरबीआयनं परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्यभरातील पीएमसीचे ग्राहक चिंताग्रस्त आहेत.
अनेक ग्राहकांचे मेहनतीचे पैसे बँकेत अडकले आहेत. मुंबईसह देशभरात यासाठी आंदोलनं करण्यात आली. यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला. अनेक ग्राहक बँके बाहेरच ठांड मांडून बसले होते. पण पीएमसी बँक ग्राहकांना कुठलाच दिलासा मिळाला नाही.
मुंबईतल्या वरळी भागातील कुत्र्याला एका सुरक्षारक्षकानं मारहाण केली. लकी असं या कुत्र्याचं नाव होतं. यात त्या कुत्र्याला गंभीर जखमा झाल्या. काही दिवस उपचार घेतल्यानंतर लकीचा मृत्यू झाला. यासाठी देखील प्राणीमित्र एकवटले.
वांद्रे इथल्या कार्टर रोड परिसरात प्राण्यांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्यात आले. फक्त लकीच नाही तर असा प्रकारे अनेक प्राण्यांवर अत्याचार केला जातो. याचाच विरोध प्राणीमित्रांकडून केला गेला.