कांदिवली - महापौर चषक हँडबॉल स्पर्धा 2016 या स्पर्धेत 15 संघांनी भाग घेतलाय. यामध्ये मुलांचे 10 संघ आणि मुलींचे 5 संघ आहेत. ही महापौर चषक स्पर्धा वर्षातून दोनदा होते. पहिल्यांदा दक्षिण मुंबईत आणि आता उत्तर मुंबईच्या कांदिवलीत प्रथमच ती होणार आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाचे कांदिवली येथील पदाधिकारी मधू भंडारकर यांनी सांगितलं की, अशा स्पर्धांतून पुढे आलेले आमचे अनेक खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांतूनही खेळातायत. या स्पर्धेचा अंतिम सामना भंडारकर विरुद्ध औरंगाबाद असा होणार आहे. विजेत्याला चषक, पदकं आणि किटही दिलं जाईल.