Advertisement

एेतिहासिक! भारताला राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक

बॅडमिंटनमध्ये सोमवारी भारतीय खेळाडूंनी नव्या अध्यायाची नोंद केली. भारताने मलेशियाचा ३-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. मात्र मिश्र सांघिक प्रकारात भारतानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिलंवहिलं सुवर्णपदक अाज अापल्या नावावर केलं.

एेतिहासिक! भारताला राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक
SHARES

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची लयलूट सुरू असतानाच बॅडमिंटनमध्ये सोमवारी भारतीय खेळाडूंनी नव्या अध्यायाची नोंद केली. भारताने मलेशियाचा ३-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. मात्र मिश्र सांघिक प्रकारात भारतानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिलंवहिलं सुवर्णपदक अाज अापल्या नावावर केलं.


भारताची दमदार सुरुवात

सात्विक रांकीरेड्डी अाणि अश्विनी पोनप्पा यांनी पेंग सून चॅन व लिऊ यिंग गोह यांचा पाडाव करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. सात्विक-अश्विनी यांनी हा सामना २१-१४, १५-२१, २१-१५ असा जिंकत भारताला १-० अशी अाघाडी मिळवून दिली.



श्रीकांतला ली चोंग वेईला 'दे धक्का'

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याच्यासमोर गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चोंग वेई याचे अाव्हान होते. मात्र किदम्बी श्रीकांतसमोर चोंग वेईची डाळ शिजू शकली नाही. श्रीकांतने हा सामना २१-१७, २१-१४ असा सहज जिंकत भारताची अाघाडी २-० ने वाढवली.



सात्विक-शेट्टी पराभूत

सात्विक रांकीरेड्डी अाणि चिराग शेट्टी यांच्यावर तमाम भारतीयांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी निराशा केली. सात्विक-चिराग यांनी कडवी लढत दिली खरी मात्र त्यांना व्ही. शेम गोह अाणि वी किअोंग टॅन यांच्याकडून १५-२१, २०-२२ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला.



सायनाने बाजी मारली

सायनाच्या विजयाने भारताचे एेतिहासिक सुवर्णपदक निश्चित होणार असल्यामुळे तिच्यावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पहिला गेम २१-१५ असा जिंकून सायनानं अाश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियाची सोनिया चीह दुखापतग्रस्त झाली तरी तिने हा गेम २१-१९ असा जिंकून सामन्यात रंगत अाणली. अखेर तिसऱ्या गेममध्ये ११-९ अशा स्थितीत असताना सायनाने पुढील सर्व गुण जिंकत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. तिने हा सामना २१-१५, १९-२१, २१-९ असा जिंकला.


हेही वाचा -

टेबल टेनिसमध्ये १२ वर्षांनंतर भारताचा 'सुवर्ण'पंच

राष्ट्रकुलमध्ये ठाण्याच्या मधुरिका पाटकरला टेबल टेनिसमध्ये सांघिक सुवर्णपदक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा