क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (MCA President Amol Kale) यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
ते नागपूरचे होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.
अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर गेले होते. त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघांत रविवारी खेळवण्यात आलेला सामनाही पाहिल्याची माहिती आहे.
Mumbai Cricket Association president Amol Kale has passed away due to a cardiac arrest in USA. Kale (wearing a cap in the pic) watched the India vs Pakistan match live from the stadium along with MCA office bearers @the_hindu @sportstarweb pic.twitter.com/f3Nl2KFEeK
— Amol Karhadkar (@karhacter) June 10, 2024
ऑक्टोबर 2022 मध्ये अमोल काळे यांची MCA अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी विश्वचषक चॅम्पियन संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात अध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत होती, मात्र नंतर अमोर काळे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
अमोल काळे यांनी खेळांडूसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यातीलच एक म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ पुरुषांची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय. आगामी मोसमापासून मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार आहे.