वर्ल्ड सिनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरी फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुंबईकर सुप्रिया देवगुण आणि सहकारी असलेल्या पटीयालाच्या नॅन्सी टंडन या दोघींनी विजय मिळवत कांस्य पदकाला गवासणी घातली. ही स्पर्धा कोचीतील मनोरमा येथे पार पडली.
सुप्रिया आणि नॅन्सी या दोघींनी सुरुवातीला उत्तम, अशी खेळी केली. पण पहिल्याच सामन्यात त्यांच्या पदरात अपयश आले. प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाच्या ओल्गा ब्र्यांत आणि ओल्गा कुझनेतसोवा यांनी दोन सेटमध्ये 16 - 21, 19-21 असे गुण करत भारताचा पराभव केला. दसुऱ्या सामन्यात स्वेडिशच्या अंजा ओल्सेन आणि मारीया स्वडेल यांचा सुप्रिया आणि नॅन्सीने 21-11, 21-13 अशा फराकाने पराभव करत उप-उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या एलिझाबेथ तजंद्रा आणि ह्ये जेआँग हन यांचा 21-19, 21-13 अशा फराकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पण उपांत्य फेरीत मात्र भारताच्या सुप्रिया आणि नेन्सी जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबईच्या सुप्रियाने मागच्या महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या फू कॉक कीयाँग इंटरनॅशनल कप 2017 या स्पर्धेतसुद्धा दुहेरी गटात कांस्य पदक मिळवला होता.
हेही वाचा -
बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा पराभव