Advertisement

मुंबईत रंगणार सक्षम सायक्लोथॉन २०१८


मुंबईत रंगणार सक्षम सायक्लोथॉन २०१८
SHARES

पेट्रोलियम कंझर्व्हेशन रिसर्च असोसिएशनतर्फे भारत सरकारच्या पेट्रोलियम अाणि नैसर्गिक गॅस मंत्रालयातर्फे मुंबईत सक्षम सायक्लोथाॅन २०१८ चे अायोजन करण्यात अालं अाहे. पेट्रोलियम पदार्थांचा प्रभावी वापर कसा करावा अाणि पेट्रोलियम पदार्थांची निगा कशी राखावी, याच्या जनजागृतीसाठी २५ फेब्रुवारी रोजी ही सायक्लोथाॅन स्पर्धा रंगणार अाहे. या सायक्लोथाॅनच्या माध्यमातून मुंबईकराना सुदृढ आयुष्य जगण्यासाठी तसंच पर्यावरणासंबंधी आपलं योगदान देण्याचा संदेश दिला जाणार अाहे. कमी अंतराच्या पल्ल्यासाठी सायकलचा वापर करण्याचे महत्त्व याद्वारे पटवून दिले जाणार अाहे. सायक्लोथाॅनसाठी २० फेब्रुवारीपर्यंत http://www.sakshamcyclothon.com/Sakshammumbai.html या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. या स्पर्धेत १० लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार अाहेत.


अाठ गटात होणार स्पर्धा

या सायक्लोथाॅनमध्ये ५८ किमी एलिट पुरुष, ३८ किमी एलिट महिला, २८ किमी हौशी एमटीबी अाणि हायब्रीड पुरुष व महिला, हौशी एमटीबी रोड बाईक पुरुष व महिला तसेच ८ किमी ग्रीन राईड अशा अाठ गटांत ही स्पर्धा खेळविण्यात येणार अाहे. सक्षम सायक्लोथॉनमध्ये तब्बल ५००० हून अधिक सायकलपटू सहभाग नोंदवणार अाहेत. मुंबईतील पी. जे. हिंदू जिमखाना, विल्सन जिमखाना ग्राऊंड अाणि नेताजी सुभाषचंद्र बोस रोड येथून सुरुवात होणार अाहे.


या माध्यमातून रोजच्या व्यवहारासाठी म्हणजेच मार्केट, शाळा व कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यात यावा. फिट राहण्यासोबतच पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच पुढच्या पिढीकरता इंधन जतन करणे, हा या सायक्लोथाॅनचा मुख्य उद्देश आहे.
- आर. के. अहुजा, पीसीआरए, प्रोजेक्ट सचिवालयाचे संचालक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा